। पनवेल । वार्ताहर ।
65 लाखांचा कॅमेरा 38 लाख रुपयाला देतो असे सांगून 38 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी प्रबोध हरिश्चंद्र भोसले (रा. साई वर्ल्ड सिटी, मेप्रोपोलस, पनवेल) याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेबसाईट डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर सोल्युशनचे काम करणारे सचिन बापू गुंजाळ हे सेक्टर 36 शंकर हाइट्स, कामोठे येथे राहत असून, प्रबोध भोसले याने 65 लाख रुपयांचा सोनी एफ 76 मिरर लेस 2022 मेड इन साऊथ कोरिया हा कॅमेरा 38 लाख रुपयाला देतो असे सांगितले व प्रबोध यांनी सचिन यांना साई वर्ल्ड सिटी, पनवेल येथे बोलावून त्यांच्याकडून 38 लाख रुपये रोख घेऊन सचिन यांना कॅमेरा दिला नाही व पैसे घेऊन 38 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.