| माणगाव | प्रतिनिधी |
बसस्थानकातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेची फिर्याद मुलीच्या नातेवाईकांनी माणगाव पोलिस ठाण्यात सोमवार 11 डिसेंबर रोजी दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या नातीला आरोपी सागर सखाराम कोळी रा. पाथरशेत आदिवासीवाडी ता. रोहा याने पळवून नेले. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.







