लायन्स क्लब मांडवाच्या अध्यक्षपदी अभिजीत गुरव

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब मांडवाचा 2023-24 या वर्षासाठीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मुशेत येथील हॉटेल ट्रॉपिकानामध्ये रविवार, 9 जुलै रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी पदग्रहण करुन पदाची सूत्रे घेतली. यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले. लायन्स क्लब मांडवाच्या सदस्यांच्या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी सुरेंद्र शर्मा, प्रवीण सरनाईक, अनिल जाधव, प्रियदर्शिनी पाटील, विद्या अधिकारी, बाळकृष्ण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी उपस्थित लायन्सना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी लायन्स क्लब मांडवाच्या नवीन सदस्यांचा शपथविधी व अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे पदग्रहण करण्यात आले. लायन्स क्लब मांडवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत गुरव, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव प्रिती पाटील, खजिनदार सतीश म्हात्रे यांनी पदाची सूत्रे हाती घेतली, तसेच इतर पदाधिकारीउज्वला पाटील, निकिता पाटील, मोहिनी गुरव, नितीन अधिकारी, बाळकृष्ण कोळी, अजय अंगणे, विजयराव देशमुख, ॲड. ऋग्वेद ठाकूर, मीनल ठाकूर, प्रदीप पाटील, विलास पाटील, अमरेश शिरगावकर, अरविंद घरत, मोहन पाटील, धवल राऊत, अमिश शिरगावकर, सुमित पाटील, हर्षद पाटील, सुबोध राऊत या संचालकांसह नवीन सदस्य बनलेल्या दर्शन ठाकूर, विजय पाटील, अंकिता अंगणे यांनी शपथग्रण केले. या कार्यक्रमासाठी कुणाल पाथरे, जितेश्री ठाकूर, अनिल म्हात्रे, विकास पाटील, प्रदीप सिनकर, प्रमोद राऊत, विनोद पाटील, मनोहर चवरकर, प्रमोद पाटील, नयन कवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन मृदुला राऊत, मीनल ठाकूर यांनी केले, तर आभार प्रिती पाटील यांनी मानले.

Exit mobile version