| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या सविता कडवे थेट सरपंचपदी निवडून आल्या. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. उपसरंपचपदाची निवडणूक झाली. त्यामध्ये अभिजीत अजित कडवे बिनविरोध निवडून आले. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मिळकतखार ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंचांसह आठ जागांसाठी झाली. त्यात थेट सरपंच म्हणून सविता गोरख कडवे बहुमताने निवडून आल्या. तसेच सदस्य म्हणून अभिजीत कडवे, पूनम प्रणित कडवे विजयी झाल्या. या निवडीनंतर नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. अभिजीत कडवे यांचा या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. विलास कडवे यांच्या प्रयत्नाने यश संपादन करण्यात आल्याचे कडवे यांनी सांगितले.