| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.7) अलिबागसह राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात सकाळी 10 वाजता अभिष्टचिंतन सोहळा होणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
वाढदिवसानिमित्त दिवसाची सुरुवात खारेपाट शेकाप विभागाच्या वतीने पेझारी येथे वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता पीएनपी नाट्यगृहाच्या मैदानात शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सकाळी 10 वाजता मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला बडोदा राजघराण्याचे वंशज महाराज समरजीतसिंह गायकवाड, आमदार सतेज पाटील, आमदार रोहित पवार, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार सत्यजित तांबे तसेच ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक राजू परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे.
यंदा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन, कंपास बॉक्स, शालेय दप्तर आणि अन्य शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक यांनी केले आहे. हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरचिटणीस जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेच्या नियोजित वेळेतच होणार आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची स्नेहभोजनाची व्यवस्था व पार्किंगची व्यवस्था पीएनपी नाट्यगृहापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आरडीसीसी बँकेच्या मागे असणाऱ्या भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे येथे करण्यात आली आहे. तरी, या सोहळ्यास कार्यकर्ते, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अभिष्टचिंतन आयोजक समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.न सोहळ्याचा कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेच्या नियोजित वेळेतच होणार आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची स्नेहभोजनाची व्यवस्था व पार्किंगची व्यवस्था पीएनपी नाट्यगृहापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आरडीसीसी बँकेच्या मागे असणाऱ्या भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे येथे करण्यात आली आहे. तरी, या सोहळ्यास कार्यकर्ते, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले आहे.






