। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिक जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. गावच्या सरपंचानेच दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सरपंचाने मुलींच्या आजीच्या मदतीने या दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना चांदवडच्या विटावे गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून आरोपीने वारंवार पीडित मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. त्याने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर आणि विटावे अशा ठिकाणी शरीरसंबध ठेवल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपीसोबत जाण्यास जेव्हा पीडित मुलींनी नकार दिला, तेव्हा आजीने दोघींना चावा घेत व शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन घरात कोंडून ठेवले. आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलींनी चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, अधिक तपास पोलीस करीत आहेत.