ब्रेकिंग! श्री क्षेत्र महड येथे अपघात, मोटारसायकलस्वार फरार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

श्री क्षेत्र महड येथे 10.30 च्या दरम्यान वरदविनायकाचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कुटुंबातील राव साहेब फाफळे -56 हे आपल्या इनोवा कार मधून लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उतरले असता, मागून आलेल्या मोटारसायकलस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली, त्या धक्क्याने ते खाली पडले. कुटुंबीय त्यांना सावरण्याच्या गडबडीत असताना तो मोटारसायकलस्वार फरार झाला आहे.

राव साहेब फाफाळे यांना डॉ साबणे हॉस्पिटल खोपोली येथे उपचारार्थ आणले असता, त्यांच्या पायाला मेजर फ्रॅक्चर आणि अजून काही दुखापती असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांना लागलीच तळेगाव येथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना मदत करण्याच्या हेतूने विजय भोसले आणि अंकुश मोरे हे ॲम्बुलन्स मधून तळेगाव येथे घेऊन जात आहेत.

Exit mobile version