वाशीनाका येथे अपघात; एकाचा जागीच मृत्यू

। गडब । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर वाशी नाका येथे झालेल्या ट्रेलर व मोटरसायकलच्या अपघातात मोटर सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रकाश महादू पाटील (वय 49, रा. कोपर पो.जोहे) हे मोटरसायकल क्रमांक एमएच 06 इ 5988 वरून सकाळी 9:30 च्या सुमारास जात होते. वाशी नाका येथे आले असता त्यांना पाठीमागून येणार्‍या ट्रेलर क्रमांक आरजे 19 जीजी 2942 ने जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रेलर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकाश पाटील यांचे गडब येथे मेडिकलचे दुकान आहे. त्यांच्या निधनांची वार्ता कळताच गडब गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातासंदर्भात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पेण पेालीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version