| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खरसुंडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मुलाचे वडील जखमी झाले आहेत त्यांच्यावर एम.जी.एम रुग्णालय कळंबोली येथे उपचार सुरु आहे.
मिळालेल्या सुत्राच्या माहितीनुसार लोधीवली येथे राहत असलेले समीर पार्टे हे माडप येथील एका व्यवसायिककडे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. रविवारी (दि.2) रोजी सुट्टी असल्यामुळे मुलांचे केस कापण्यांसाठी खरसुंडी येथे आले असतांना, हा अपघात झाला. या अपघातमध्ये 4 वर्षाच्या मुलांचा मृत्यू झाला असून, वडील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर, एम.जी.एम रुग्णालय कळंबोली येथे उपचार सुरु आहेत. खरसुंडी हा रस्ता अपघातांचे केंद्र बिंदु बनला असून, या ठिकाणी काहीना आपले प्राण गमवावे लागले आहेत.