| पनवेल | वार्ताहर |
दुकानाचे शटर फोडून रोख रक्कमेसह मोबाईलची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना कोपरा गाव येथे घडली आहे. उस्मान खान यांच्या चिकन सेंटरच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या रुममध्ये ते राहतात. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीच्या शटरमधून आत प्रवेश करून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मिळून जवळपास 45 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.