| पनवेल | वार्ताहर |
मुलीला का ओरडता असे विचारणा करण्यासाठी पतीकडे गेलेल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उसर्ली खुर्द येथे घडली आहे. या ठिकाणी राहणार्या महिलेने आपल्या मुलीला का ओरडता हे विचारणा करण्यासाठी त्या पतीकडे गेल्या असता पतीने लाटण्याने तीला मारहाण केल्याने व त्यात ती जखमी झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.