| पनवेल | वार्ताहर |
आपल्या घरातील बाथरुमधील बल्ब चालू करीत असताना वायरला पीन नसल्याने मोकळ्या वायरला हात लागून, ती शॉकेटमध्ये घालून लाईट चालू करण्याचा प्रयत्न करताना त्याचा शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे. सदाशिव गायकवाड (45) असे या इसमाचे नाव असून त्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.