खारपाले जवळ अपघात ; एक ठार, दोन जखमी

। गडब । वार्ताहर ।
महामार्गावर खारपाले गावाजवल कार ट्रेलरवर आदलल्याने झालेल्या अपघातात एक ठार व दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागोठणेकडून येणारा ट्रेलर वडखळकडे जाणार्‍या कारवर आदळला.त्यात कारमधील अभिषेक अमृत म्हात्रे (वय 23 रा.डोलवी) हा जागीच ठार झाला तर देवेंद्र दत्तात्रेय गोखले , महम्मद फिरोज आलम राहाणार वडखळ हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली.

Exit mobile version