बागमळा पेट्रोल पंपाजवळ एसटी-बसची समोरासमोर धडक; ५५ जण जखमी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग- रेवदंडा मार्गावर बागमळा पेट्रोल पंपाजवळ एसटी (एमएच २० बीएल ३६९३) व बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू ९९३९) समोरासमोर धडक दिली. या अपघातात ५५ प्रवासी जखमी झाले. जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील शारदा पेट्रोल पंपाजवळ जेएसडब्ल्यू व एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये बसमधील 55 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यांना अलिबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.

Exit mobile version