कुर्डुस रोडवर अपघात; एकचा मृत्यु

। अलिबाग । वार्ताहर ।

पोयनाड-नागोठणे रोडवर कुर्डुस रोडवर नागदेवनगर येथे कोपरी गावच्या हददीत झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे व त्याच्यासोबत असलेल्याला गंभीर दुखापती होऊन तो व्यक्ती जखमी झाला आहे. पोयनाड नागोठणे रस्त्यावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून फक्त 1 की.मी. अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात जखमी विकास मिसाळ आणि त्याच्या सहकार्याला जखमी अवस्थेतच शेजारच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात हवलण्यात आले. दुसर्‍या अपघातग्रस्त इसमाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जे.जे. रुग्णालय मुंबई येथे हालवण्यात आले आहे.
या अपघाताबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version