मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; तरूणाचा मृत्यु

। खोपोली । प्रतिनिधी ।
पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवरील कुंभवली गावच्या हाद्दीत मुंबई लेनकडे जाणाऱ्या इसमाला अज्ञात वाहने धडक दिल्याने आपघात शरिरास गंभीर जखमा होवून तो मयत झाला असून धडक देणारा अज्ञात वाहनावरील चालक अपघाताची खबरदे न पळून गेला आहे. तसेच मयत इसमाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी शोधपत्रिकेचारे घोषीत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलिस ठाण्याच्या हाद्दीतील एक्सप्रेसवेरील मुंबई लेनवर मौजे कुंभवली गावच्या हद्दीत एका इसमाला अज्ञात वाहने धडक दिल्याने आपघात झाला आहे या अपघातात तरुणाच्या शरिरास गंभीर जखमा होवून तो मयत झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनावरील चालक अपघातानंतर पळून गेला आहे. अज्ञात मयत पुरूषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, उंची अंदाजे ५ फुट रंगाने सावळा, अंगात फुल बाहीचा सफेद बदामी रंगाचा शर्ट त्याचे कॉलरवर Blue Ocen असा मार्ग असलेला फाटलेला व रक्ताने माखलेला तसेच निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट तीचे कमरेस बाहेरील बाजुस Four-STM असे लेदरचे मार्ग एकच पाय असलेली फाटलेली असून उजव्या हाताचे पंजावर ॐ गोंदलेले तसेच उजवे हाताचे दंडावर त्रिशुल व त्यामध्ये गोंदलेले आहे.

या अपघाताबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास यंत्रणा खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिप आरोटे हे करीत असून या मयत व्यक्तीच्या वर्णनावरून कोणाला माहिती मिळाल्यास खालापूर पोलीस ठाण्यातील ८८८८८२००९६ व ०२१९२-२७५०३३ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन उपनिरीक्षक आरोटे यांनी केले आहे.

Exit mobile version