| नवीन पनवेल | वार्ताहर |
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर कि.मी 3 आदई गावाजवळ खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत चार चाकी वाहनाने धडक दिल्याने यात पादचार्याचा मृत्यू झाला आहे. त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. यातील इनोव्हा कारवरील चालक जितेंद्र चिंभा शिंदे हे पुणे बाजूकडे जात असताना अचानक एक अज्ञात पादचारी इसम (50) नाव-गाव माहित नाही, पुणे लेनवरून मुंबई लेनकडे रस्ता पार करीत असताना समोर आल्याने कार चालकाचा त्याच्या ताब्यातील वाहनाचा ताबा सुटला. या अज्ञात पादचारी इसमाला दुसर्या लेनवर ठोकर लागल्याने पादचारी इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रस्त्याचे बाजूला घेऊन आयआरबी अॅम्बुलन्सच्या डॉक्टरांनी त्याला तपासून जागेवरच मृत घोषित केले. पादचारी मयत इसमास खाजगी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.