। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खडी कॅशर असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खडी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू असताना यातील अजरुंन गावाच्या लगत असणार्या सी.बी.सिंग खडी कॅशरमधील ब्लास्टिंगमुळे माणकीवली ग्रामपंचायत कार्यालयाला तडे गेल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीने वेळोवेळी निवेदन दिले असता खडी क्रशर मालक या निवेदनाला केराची टोपली दाखवत आहे.
माणकीवली ग्रामपंचायत नवीन 25 लाख रुपये खर्च करुन कार्यालय बांधण्यात आले.परंतु काही महिन्यातच या कार्यालयाला ब्लास्टिंगमुळे तडे गेल्याने ग्रामपंचायतीने मालकाला या संदर्भात निवेदन देत आपल्या खडी क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे कार्यालयाला तडे गेल्याची कल्पना देत निवेदन दिले असता खडीमशीन मालक याकडे कानाडोळा करत करीत आहे.
अजरुंन गावाच्या हद्दीत असणार्या सी.बी.सिंग खडीमशीनमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्वच भिंतींना मोठमोठे तडे गेले असून या तड्यामुळे नव्या इमारतीच्या सौंदर्याला गालबोट या खडी क्रशरमालकाच्या मनमानी कारभारामुळे लागत आहे, त्यामुळे महसूल विभागाने या खडी क्रशर मालकावर कडक कारवाई करावी.
बाळकृष्ण वाघमारे,
सरपंच
सी.बी.सिंग या खडी क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे ग्रामपंचायत कार्यालयाला तडे गेल्याने या संदर्भात या खडी क्रशर मालकाला दोन वेळा निवेदन दिले असता याकडे त्याने कानाडोळा केला असून या मालकाने याचे गांभीर्य न घेतल्यास पुढील काळात ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला मोठा धोका उद्भवू शकतो.
सखुबाई कडाले,
ग्रामसेविका