सिद्धांत रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लबचे सुयश
। चिरनेर । प्रतिनिधी ।
दिल्ली येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सिद्धांत रायफल क्लब मार्फत महाराष्ट्र रायफल संघटनेने प्रतिनिधित्व केले होते. यात गौरव जगदीश ठाकूर याने दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुयश प्राप्त करून, नॅशनल रीनाउंड शॉट ही पदवी संपादन केली आहे. तर वेदांत खारके, सुप्रीता सुबुद्धी, जयंता साळवे हे विद्यार्थीदेखील नॅशनल रीनाउंड शॉर्ट पदवीस पात्र ठरले आहेत.
सिद्धांत रायफल क्लबचे प्रीतम पाटील, प्रशिक्षक अलंकार कोळी, प्राचार्य गौरी शहा, कोळी सर, विश्वजीत सर, अंबरनाथ चौधरी, समाधान घोपरकर, अतुल मोकल, सुनील मढवी या सर्वांनी या विद्यार्थ्यांना सरावासाठी योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करून, सराव करून घेतला होता. त्यामुळे हे नेत्रदीपक यश प्राप्त झाले आहे. दरम्यान या नेमबाजी स्पर्धेतील विजेत्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.