| उरण | प्रतिनिधी |
उरणमध्ये अपघातांचे सत्र सुरूच असून खोपटा पूल ते नवघर मार्गावरील भेंडखळ वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने दुचाकीस्वाराने सावधगिरी बाळगून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
उरण परिसरामध्ये बेदरकरपणे वाहने चालवल्याने आणि नियमाचे उल्लंघन केल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यातच सोमवारी (दि.13) सकाळच्या सुमारास खोपटा पूल ते नवघर मार्गावरील भेडखळ वळणावर ट्रेलरने इंडिकेटर न देता वाहन वळवल्याने बाजूने चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीस्वाराने आपल्या मोटरसायकल सोडून बाजूला उडी घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, दुचाकी त्या ट्रेलरच्या खाली जाऊन तिचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मोटर सायकल स्वाराने बाजूला उडी घेतल्याने तो बचावला. ट्रेलरचालकाचे नाव जयप्रकाश बेचई यादव (31) असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.







