कर्तबगार नेता प्रीतम म्हात्रे

। चाणजे । वार्ताहर ।

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्याकडे येथील मतदार आस्थेने व अपेक्षेने पाहात आहे. त्यामुळे उरण तालुक्याला एक कार्यक्षम व समाजसेवेला वाहुन घेणारा कर्तबगार नेता प्रीतम म्हात्रे यांच्या रूपाने मिळाला असुन जनतेच्या हाकेला धावून येणारा नेता आहे, असा विश्‍वास उरणचा प्रत्येक मतदार व्यक्त करीत आहेत.

निवडणुक लढवित असलेले उमेदवार मा.मनोहर भोईर व मा. महेश बादली यांनी उरणचे आमदार पद भूषविले आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी आमदार पदाच्या कार्यकाळात कोणतीही विकास कामे केली नाहीत तसेच त्यांनी साधा जनसंपर्क देखील साधला नसून अशा अकार्यक्षमांना येथील मतदार घरी बसवतील, अशा चर्चा उरण विधानसभा मतदासंघात होत आहेत.

मतदारांच्या भावना व अपेक्षा लक्षात घेऊन शेकापचे कार्यकर्ते मोरेश्‍वर भोईर यांनी सांगीतले की, गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा आताचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे कर्तव्यदक्ष, कर्तबगार तसेच मतदारांच्या हाकेला उभा राहाणारा नेता आहे. यामुळे प्रीतम म्हात्रे यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यावेळी उरण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत, सुप्रिया म्हात्रे, शंकर भोईर, मनिष कातकरी आणि शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version