| मुंबई | प्रतिनिधी |
गोरेगावमधून 5 वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीला 24 तासांत अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. आरोपीच्या ताब्यातून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून, मुलाला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मूल नसल्यामुळे अपहरण केल्याचे आरोपीने सांगितले.
तक्रारदार अनिता शर्मा या गोरेगाव पूर्व येथील रेल्वे पुलाखाली राहतात. त्यांचा पाच वर्षांचा लहान मुलगा राम शर्मा (नाव बदलले) याचे गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळील पुलाखालून अपहरण करण्यात आले होते. आरोपी करण कनोजीया (24) हा तक्रारदार महिलेच्या पतीचा मित्र होता. त्याने 12 फेब्रुवारीला मुलाला उचलून नेले. त्यानंतर तक्रारदार महिलेने याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे व पथकाला याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. आरोपी कल्याण परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.