। पनवेल । वार्ताहर ।
बेकायदेशीररित्या पत्यांचा जुगार पैसे लावून खेळल्याप्रकरणी 16 जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 22 हजार 570 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वाजेपूर या ठिकाणी बेकायदेशीररित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 16 जणांना ताब्यात घेतले.