। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील भरणेनाका येथे पोलिसांनी बेकायदेशीर दारूविरोधी कारवाई केली आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश दत्ताराम गमरे याच्याकडून 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सन्मान हॉटेलच्या पाठीमागे सापळा लावून आरोपीला रंगेहाथ पकडले. ही दारू कुठून आणि कुठे विकली जाणार होती, याचा अधिक तपास सुरू आहे.