। बीड । प्रतिनिधी ।
बीड येथील आठवले गँगसोबत राहणार्या मनीष क्षीरसागरच्या घरात तीन महिन्यांपूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना सापडला होता. यामध्ये बीड शहर पोलिसांनी प्रमुख आरोपीला अटक केली होती. परंतु, यातील मनीष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता. बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून त्याला अटक केली आहे.
पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हेसुद्धा सोबत होते. तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासासंदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यास सुरवात केली होती. मनीष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून त्यांचा ताबा घेतला आहे. त्यानंतर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली.