| पनवेल | प्रतिनिधी |
अपर तहसील कार्यालय पनवेलच्यावतीने माती आणि गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक करणार्या 13 गाड्यांवर कारवाई केली असून, या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन सुरु आहे. अनेक मोठमोठ्या वाहनांमध्ये जास्त प्रमाणात गौण खनिज भरुन त्याची वाहतूक केली जाते. खारपाडा ते पनवेल परिसरात अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार संभाजी शेलार, मंडळ अधिकारी तेजस चोरघे, तलाठी आदींनी कारवाई करत माती आणि गौण खनिजाची वाहतूक करणार्या 13 गाड्यांवर कारवाई केली. तसेच या गाड्या जप्त केल्या. दरम्यान, अशाच प्रकारची कारवाई यापुढेदेखील सुरु राहणार असल्याची माहिती अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली.