| पनवेल | प्रतिनिधी |
गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिराच्या बाजूला चिरंजीत पहाडी (42), रा. कळंबोली हा तळाहातावर हिरवट मळकट रंगाची पाने फुले असलेला गांजा अंगठ्याच्या सहाय्याने मळून मातीच्या चिलीममध्ये भरुन जळत्या काडीने पेटवत असताना मिळून आला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार व पो.शि.विशाल दुधे आदींच्या पथकाने या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली.