ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर कालवश

। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांतील ख्यातनाम अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा आहे. उत्तरा बावकर या तमस या मालिकेमुळे प्रकाशझोतात आल्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले होते. अभिनय व आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले.

Exit mobile version