‘बॉर्डर-गावस्कर मालिका अटीतटीची होणार’
। नवी दिल्ली । वृत्तसंस्थ ।
या वर्षाआखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघ 5 कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघाने मागील दोन मालिकेत ऑस्ट्रेलियात तिंरगा फडकावला आहे. शेवटच्या दोन मालिकेत भारताने कांगारुनां धोबीपछाड दिला आहे. यंदा भारतीय संघ तिसर्यांदा यजमान संघाला हरवून मालिका विजयाची हॅट्ट्रीक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ भारताला रोखण्याचे नक्कीच प्रयत्न करेल. यादरम्यान दोन्ही संघातील माजी क्रिकेटपटूंनी अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. यात ऑस्ट्रेलिया संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज गिलख्रिस्टने बॉर्डर-गावस्कर मालिकेवर भविष्यवाणी केला आहे.
गिलख्रिस्टने दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकणार्याला संघाला निवडले आहे. माजी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज भविष्यवाणी करताना म्हणाला की, स्वाभाविकच आहे मी ऑस्ट्रेलियाचेच नाव घेणार आहे. आशा आहे की ते यंदाची मालिका जिंकतील. पण, यावेळेसची मालिका अटीतटीची होणार आहे. दोन्ही संघामध्ये कमालीचे सामने पहायला मिळतील. तो पुढे म्हणाला, ही मालिका दोन्ही संघासाठी कठीण स्पर्धा होणार आहे. यजमान संघावर जबाबदारी असणार आहे की, ते आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आधिक मजबूत संघ आहे. तर, भारतला माहिती आहे की, विदेशात कसे सामने जिंकायचे. सध्याच्या घडीला भारताची गोलंदाजी युनिट आधिकाधिक संघांपेक्षा चांगली आहे. ते येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात सक्षम आहेत. या व्यतीरिक्त भारताकडे शानदार फलंदाजांची फळी आहे. ही मालिका खूप खूप टक्कर आणि बरोबरीची होणार आहे.