खरोशी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

| नागोठणे । वार्ताहर ।
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील आदर्श उत्कृष्ट प्राथमिक शाळा म्हणून पेण तालुक्यातून रा.जि.प. केंद्रशाळा-खरोशी या शाळेची सन 2022-2023 साठी निवड झाली आहे. या शाळेस प्रथम क्रमांकाचे रुपये 50 हजारचे बक्षीस जाहीर झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे व तो शाळेत टिकला पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थ्याना या शाळेत ज्ञानदान केले जाते. स्पर्धायुगात आपला विद्यार्थी टिकावा म्हणून शालेय व्यवस्थापन सतत प्रयत्न करत असते. लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता, शालेय व सहशालेय उपक्रम, शाळेची रंगरंगोटी व सजावट, शाळेसाठी ज्या शैक्षणिक गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी लोकसहभागातून ग्रामस्थांनी मोठया मनाने देऊन केलेले सर्व डिजीटल वर्ग, सुसज्ज मिनीसायन्स लॅब, उपलब्ध जागेत परसबाग, माझी ई शाळा लर्निग प्रथम संस्था उपक्रम या गोष्टींचे स्वयंमूल्यमापन व पुनर्मूल्यांकन होऊन शाळेला उत्कृष्ट आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ही केंद्रशाळा जिल्ह्यात उत्कृष्ट आदर्श करण्यासाठी किशोर महादेव म्हात्रे, सदानंद पाटील, उदय म्हात्रे, राजेंद्र शिंदे, आदिती चेऊलकर, गणपत पाटील, वैशाली पाटील सर्व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.

Exit mobile version