| पनवेल | वार्ताहर |
खांदा कॉलनी येथील सी.के.टी वाणिज्य, कला, विज्ञान, महाविद्यालयातील डॉ. सी. डी देशमुख (बँकिंग) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नोकर भरतीच्या पूर्वतयारीसाठी दिनांक 9 मे ते 9 जून 2023 या कलावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा मार्गदर्शन वर्ग सर्वांसाठी खुला असून इतर महाविद्यालयातील विद्यार्थी देखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व अभ्यासिकेसह प्रवेश आणि फक्त लेक्चर्स करिता प्रवेश असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. सदर मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक विजय शितोळे आणि संजय हिरेमठ यांनी सदर मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.