अ‍ॅड. मनीषा मानवेंद्र वैदु यांना पुरस्कार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अ‍ॅड. मनीषा मानवेंद्र वैदु यांच्या लेखनसंग्रहांची नोंद द इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. साहित्यिक मनीषा मानवेंद्र वैदू शेवाळे यांना साहित्य साधना पुरस्कार तसेच बहाई अकॅडमी पाचगणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रम इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या लेखनाची नोंद झाली. या ठिकाणी त्यांच्या मनाची शब्दवेल आणि असे हे राग या दोन लेखन संग्रहाचे प्रकाशन झाले. तसेच त्यांना इंडियन बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र मेडल ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. साहित्य साधना पुरस्कार हा हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून प्रदान करण्यात आला. वनश्री पाटील यांनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याचा 36 महिलांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हायकु, अभंग, अष्टकरी रचना ह्या करून घेतल्या. त्या ठिकाणी देशातील साहित्यिक उपस्थित होते.

Exit mobile version