अ‍ॅडव्होकेट वॉरियर्स चॅम्पियनशिप

। पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई कोर्ट आयोजित ‘अ‍ॅडव्होकेट वॉरियर्स रब्बर बॉल चॅम्पियनशिप’ क्रिकेट स्पर्धेत पनवेल वकील संघाने उल्हासनगर वकील संघावर मात करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

पनवेल वकील संघाचे अ‍ॅड. संगम घरत, अ‍ॅड.संकेत रानडे, अ‍ॅड. विशाल डोंगरे, अ‍ॅड. सुरज म्हात्रे, अ‍ॅड. सुशांत घरत, अ‍ॅड. रत्नदिप पाटील, अ‍ॅड. सचिन म्हात्रे, अ‍ॅड. हेमंत पाटील, अ‍ॅड. अरूण पाटील, अ‍ॅड.आकाश देवकर, अ‍ॅड. विक्रम पाटील, अ‍ॅड. शैलेश नाईक, अ‍ॅड. प्रविण पिसाळ, अ‍ॅड. विजयेंद्र मुंढे, अ‍ॅड. महेश केणी यांच्या उत्कृष्ट खेळामुळे पनवेल वकील संघाने अंतिम सामन्यात उल्हासनगर वकील संघाचा धुव्वा उडवित प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. यावेळी पनवेल वकील संघटनेचे ऑडीटर अ‍ॅड.विशाल मुंडकर, सदस्य अ‍ॅड. भुषण म्हात्रे, अ‍ॅड. अमित पाटील, अ‍ॅड. इंद्रजीत भोसले, अ‍ॅड. धनराज तोकडे उपस्थित होते.

Exit mobile version