जमीनधारकांची परवानगी न घेता सुरू होती वाहतूक
| उरण | प्रतिनिधी |
कस्टम चाळ ते द्रोणागिरी माता मंदिर मार्गावर असलेल्या खासगी जमिनीवर जमीन मालकांशी कोणतीही चर्चा न करता, परवानगी न घेता अफकॉन्स कंपनीकडून सुरू असलेली डंपर वाहतूक अखेर जमीनधारकांच्या तीव्र विरोधामुळे थांबवावी लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याने अवजड डंपरचा अव्यवस्थित व धोकादायक वावर सुरू होता. या मार्गावर अनेक जमिनी खासगी असून, तेथील जमीनधारकांच्या कोणत्याही मंजुरीशिवाय कंपनीने वाहतूक सुरू केल्याने हे गंभीर उल्लंघन झाले होते. जमीनधारकांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतल्याने व कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यामुळे कंपनीला आपली वाहतूक थांबवावी लागली आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, जमीन मालक, ऑफकॅन्स कंपनीचे अधिकारी व पोलीस यांच्यात चर्चा सुरू होती.
