| पनवेल | प्रतिनिधी |
दरवर्षी गव्हाण येथे आगरी, कोळी बांधव खांदेरी किल्ल्यावर वेताळ देवाचे दर्शन घेत असतात. यावर्षीही त्यांनी बुधवारी (दि. 25) मोठ्या भक्तिभावाने उरण मोरा येथून समुद्रमार्गे बोटीने जाऊन खंदेरी या किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात आणि कोळीगीतांच्या तालावर वाजत गाजत बँड पथक घेऊन वेताळ देवाला साकडं घालण्यात आले. येथील आख्यायिकांमध्ये सांगण्यात येते की, वेताळ देवाची शिला दरवर्षी इंचा-इंचाने वाढत असते. वेताळदेव म्हणजे शिवशंकराचा अवतार मानले जातात.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनानुसार वेताळ देवाचे भक्त मनोज फडकर हे कार्यक्रमाचे नियोजन करतात. सर्वांना सुखशांती लाभो व सर्वांची भरभराट होऊन इतरांना मदत करण्याची सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना वेताळदेवाला यावेळी महेंद्र घरत यांनी केली. यावेळी एमजी ग्रुपचे किरीट पाटील, वैभव पाटील, प्रशांत पाटील, मुरलीधर ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, योगेश रसाळ, अजित ठाकूर, राजेंद्र भगत, प्रित म्हात्रे, निखिल गावंड, मेहबूब लदाफ तसेच महेंद्र घरत यांचे मित्रमंडळी व सहकारी उपस्थित होते.