| महाड | वार्ताहर |
लोकजागर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि बालकल्याण समितीचे दंडाधिकारी न्यायपीठ अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे यांना नुकताच पंढरपूर येथील संस्थेचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाडमध्ये लोकजागर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि शासनाच्या बालकल्याण समितीचे रायगड जिल्ह्याचे दंडाधिकारी न्यायपीठ अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे यांना पंढरपूर येथील स्वर्गीय हरिश्चंद्र फाउंडेशनचा यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार नुकता जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण 15 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जगन्नाथ साळुंखे हे महाड तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांची कार्यरत होते. त्यांनी लोकजागर सामाजिक संस्था आपण करून शासकीय योजना, तसेच उपक्रम ग्रामीण भागामध्ये राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शासानाच्या कृषी विभागात विभाग स्तरावर व पाणी पुरवठा व स्वच्छता अभियान, आणि आता शासनाच्या रायगड जिल्हा बालकल्याण समिती दंडाधिकारी न्यायपीठ अध्यक्ष म्हणून महिला व बालविकास क्षेत्रात काम करत आहेत. अनाथ, पीडित, एकल पालक असलेली मुले त्यांच्या साठी बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाण पत्र योजना राबविण्यात प्राधान्य देऊन रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात योजना पोहोचवून लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हरिश्चंद्र फाउंडेशनने जगन्नाथ साळुंखे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्यानंतर महाड आणि परिसरामध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.







