। मुंबई । प्रतिनिधी ।
घाटकोपरमध्ये एका टेम्पोने सहा जणांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे.
घाटकोपरच्या चिरागनगर येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी (दि. 27) संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. टेम्पोचालक बबन खरात (25) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील सहा पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली. या धडकेत प्रीती रितेश पटेल (35) यांचा मृत्यू झाला. तर रेश्मा शेख (30), अरबाज शेख (23), मारूफा शेख (27), तोफा उजहर शेख (38) आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख (28) हे जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे.