धाटाव | वार्ताहर |
तालुक्यातील तांबडी बुद्रूक ग्रामपंचायती मध्ये शेती अवजारे खरेदीच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.याबाबत ग्रामसभेत मनसेचे स्थानिक कार्यकर्ते मनोहर विठ्ठल गोरे व त्यांच्या सहकार्यांनी पुराव्यानिशी ग्रामसेवक चंद्रकांत थळे यांना जाब विचारला होता. त्यानुसार विस्तार अधिकारी यांचे मार्फत चौकशी लावली होती. मात्र ही चौकशी लागताच खरेदी केलेले सर्व शेती पुरक साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झालेले दिसून आले.
या चौकशीच्या वेळी ग्रामसेवकांनी ी शेती अवजारे खरेदी केली होती असे सांगत काही कारणामूळे ही अवजारे उपलब्ध होण्यास विलंब झाला असे सांगितले आहे. यासोबतच आता अवजारे उपलब्ध झाली असून पुढील मासिक सभेत ठराव घेऊन या अवजारांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर तक्रारदार मनोहर गोरे यांनी आपल्या तक्रारी नंतर आज ग्रामपंचायती मध्ये दाखल झालेली अवजारे दाखल झाली असल्याचे सांगितले आहे.