नाना पाटील संकुलामध्ये कृषी दिन साजरा
। पेझारी । वार्ताहर ।
1 जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून को. ए. सो. ना. ना. पाटील संकुल पोयनाड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संकुलाचे चेअरमन सुभाष प्रभाकर पाटील तथा पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 6- महाराष्ट्र एनसीसी युनिट, आर एस पी, गाईड व बी आय एस पथकांमार्फत शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये सोनचाफा, लिंबू, नारळ, सुपारी इत्यादी उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली.
एक झाड एक विद्यार्थी या संकल्पनेनुसार शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन पंडित पाटील यांनी यावेळी उपस्थितांना केले. त्यानुसार संकुलामध्ये कार्यवाही चालू आहे. बारीया प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही मुख्याध्यापिका संगीता माने यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसरामध्ये वृक्षलागवड केली. सदर कार्यक्रम प्रसंगी संकुल प्रमुख के. के. फडतरे, अंबेपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ममता पाटील, माजी उपसरपंच सुनील राऊत, सत्रप्रमुख एस. के. पाटील, तृप्ती पिळवणकर, एनसीसी प्रमुख समाधान भंडारे, आर एस पी प्रमुख संजय डोंगरे व संकुलातील सर्व सेवक वृंद उपस्थित होते.