। खरोशी । वार्ताहर ।
पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात डीएलएलई युनीट, एनएसएस युनीट, सोबती ट्रस्ट आणि उप जिल्हा रुग्णालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर रोजी ‘एचआयव्ही एड्स जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीसाठी अॅड. बापूसाहेब नेने, अॅड. मंगेश नेने, बापुराव आठवले, डॉ. सदानंद धारप, डॉ. देवीदास बामणे, डॉ. टी.डी. माळवे, डॉ. एस.डी. लकडे, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. नेने महाविद्यालयाच्या प्रांगणातून या रॅलीची सुरूवात झाली. यावेळी अॅड. मंगेश नेने यांनी रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रॅलीसाठी शुभेच्छा देत स्वत:मधील समाजमन कायम जागृत ठेवण्याचे आवाहन केले. यानंतर गांधी मंदिर-शिवाजी चौक-नगरपालिका-उप जिल्हा रुग्णालय या क्रमाने मार्गस्थ होऊन परत नेने महाविद्यालयाच्या प्रांगणात रॅलीची समाप्ती झाली. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी एड्ससंदर्भात फलक, घोषणा या माध्यमातून जनजागृती करत एचआयव्ही एड्स मुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.