पेण | प्रतिनिधी |
भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. तुकाराम माळवे लिखित तुका म्हणे पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संस्थेचे आधारस्तंभ अॅड. बापूसाहेब नेने यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. सदानंद धारप,अॅड. मंगेश नेने ,ओक ,संजय कडू साहेब ,किसन माळवे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. माळवे सर यांनी केले.
बापूसाहेब नेने यांनी तुका म्हणेफ ..या पुस्तकात डॉ. तुकाराम माळवे यांनी आपल्या सग्यासोयर्यांचा आलेख मांडला आहे. त्यांची आई अडाणी असतांना सुद्धा आपली मुले शिकावीत अशी त्यांची तीव्र इच्छा होती. तिचीच प्रेरणा घेऊन डॉ. तुकाराम माळवे पेणच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.अशीच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या पिढीचा इतिहास मांडण्यात आला आहे, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. धारप,पोरे सर, मंगेश नेने आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी माळवे कुटुंबीय, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गिरीश उपाध्ये यांनी तर आभार अॅड शोभा माळवे यांनी मानले.