। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेना नेतृत्वाने तातडीने त्यांची गटनेतेपदावरुन उचलबांगडी करीत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. हा शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शिंदे यांनी ट्विट करीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कदापि करणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सूरत येथे असलेल्या बंडखोरांपैकी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आ. नितीन देशमुख यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे.