अजित आगरकर ॲक्शन मोडमध्ये

राहुलच्या लाडक्या खेळाडू गेम

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय क्रिकेट संघाचे नवनियुक्त अजित आगरकर यानी प्रशिक्षकपदाची जबाबदारी येताच संघ बांधणीला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयमध्ये द पहिल्याच बैठकीत त्यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या लाडक्या खेळाडू लोकेश राहुलचा गेम केल्याचे म्हटले जात आहे. या खेळाडूला आता भारतीय संघात स्थान मिळणे कठीण आहे. कारण अजित आगरकर यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत आपले इरादे स्पष्ट केले आहे. अजित यांची काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयमध्ये निवड झाली. त्यानंतर त्यांनी लगेच एक बैठकही घेतली. या बैठकीत अजित यांनी एक गोष्ट दाखवून दिली की, कोणताही खेळाडू आपल्या नावाच्या जोरावर संघात स्थान मिळवू शकत नाही. आपल्या पहिल्याच बैठकीत अजित यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्यासाठी टी-20 संघाचे दरवाजे बंद करून टाकले. आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघाची बांधणी सुरु करत असल्याचे आगरकर यांनी आपल्या निर्णयाच्या माध्यमातून सांगितले. पण रोहित-कोहली यांना वनडे आणि कसोटी संघात मात्र कायम ठेवले आहे. पण द्रविड यांचा लाडका खेळाडू मात्र अजूनही संघाबाहेरच आहे. तो भारतीय संघात एंट्री घेण्यासाठी उत्सुक आहे. पण त्यापूर्वीच आगरकर यांनी त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंद केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राहुल द्रविड यांचा भारतीय संघातील लाडका खेळाडू लोकेश राहुल असल्याचे म्हटले जाते. राहुल हा गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता, पण राहुल हा फिट झाल्याचे म्हटले जात आहे. आगामी आशिया चषकासाठी त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. पण आगरकर यांनी निवड समितीचे अध्यक्षपद स्विकारल्यावर मात्र राहुलचा संघप्रवेश कठीण झाल्याचे म्हटले जात आहे. कारण फक्त फॉर्मच्या जोरावर संघ निवडला जाईल, हे अजित यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले आहे. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये राहुल फ्लॉप ठरला होता. त्यामुळे यापुढे त्याला भारतीय संघात स्थान मिळणे कठीण समजले जात आहे.

Exit mobile version