| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कामार्ले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कारभार इंडिया आघाडीच्या अजिता राजेंद्र गावंड (गजणे) यांनी शुक्रवारी स्विकारला. शेकापचे सुरेश घरत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजिता गावंड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा युवा सेना प्रमुख अमिर उर्फ पिंट्या ठाकूर, प्रवक्ते धनंजय गुरव, उपतालुका प्रमुख कैलास गजणे,जयेंद्र पेरेकर आदींसह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त, नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष वाघमारे यांनी केले.