| पनवेल | वार्ताहर |
कुळगांव बदलापूर येथील नामांकित शाळेमध्ये तेथे कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने शाळेतील अल्पवयीन लहान चिरमुड्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आज पनवेलचे तहसीलदार विजय पाटील, वपोनि नितीन ठाकरे आदींकडे करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा विकृत व नराधम माणसास फाशी पेक्षा कमी सजा देणे योग्य ठरणार नाही. तरी गृहमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने सदर खटला नामांकित व अनुभवी सरकारी वकीलाकडे देण्यात यावा, तसेच खटला फास्ट ट्रॅकवर चालवून या नराधमास लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह निलेश कांबळे, मयुर गायकवाड, असिफ शेख, अमित वाघमारे, समाधान कांबळे, चंद्रकांत वेळासकर, अशोक वाघमारे, अशोक कदम, ममताज पठाण, भारत दाताळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.