कोकण किनारपट्टीला अलर्ट कायम

| मुंबई | प्रतिनिधी |

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत. या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची
शक्यता आहे.

Exit mobile version