अलिबाग शेगाव बससेवा होणार सुरू

अलिबाग । वार्ताहर ।
रायगड विभाग अलिबाग आगारामार्फत शनिवार पासून (दि.30) पासून अलिबाग शेगाव ही रातराणी सेवा सुरू होत आहे. सदर गाडी दुपारी 3.30 ला अलिबागमधून निघणार असून सदरची गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी 6 पर्यंत शेगावला पोहोचेल. तसेच संध्याकाळी 7.30 ला शेगाव वरून निघून दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 ला अलिबागला पोहोचेल. सदर बसचा प्रवास हा पेण, खोपोली, लोणावळा, पुणे, नगर औरंगाबाद, जालना खांबगाव मार्गे होणार आहे. सदर सेवा आरक्षणासाठी उपलब्ध आहे. आरक्षणासाठी अलिबाग करीता एएलबी व शेगावकरीता एसजीएन या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करावा. तरी सर्व प्रवशांना या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी असे आवाहन अलिबाग आगार प्रमुख अजय वनारसे यांनी केले आहे.

Exit mobile version