अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘वटपौर्णिमा’ विषयावरील फोटोग्राफी स्पर्धा संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओग्राफर असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने ‘वटपौर्णिमा’ या पारंपरिक सणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी फोटोग्राफी व रील मेकिंग स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

गोकुळेश्वर तलाव परिसरात झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील १४ फोटोग्राफर आणि ८ रील निर्मात्यांनी सहभाग घेतला. मेकअप आर्टिस्ट मृणाली कांबळे व ड्रेस डिझायनर प्रितेश भगत यांनी साकारलेल्या सृष्टी पाटील आणि अर्पिता कावजी या मॉडेल्सवर आधारित छायाचित्रण करण्यात आले. स्पर्धकांनी तयार केलेले फोटो प्रिंट्स आणि रील्स हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात परीक्षणासाठी मांडण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण जिल्ह्यातील ज्येष्ठ फोटोग्राफर संदीप वाटवे आणि पेणचे फोटोग्राफर नितीन पाटील यांनी केले.

फोटोग्राफी स्पर्धेत अक्षय सुतार यांनी प्रथम, निशांत मढवी यांनी द्वितीय, तर विराज घरत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रील मेकिंग स्पर्धेत निशांत मढवी प्रथम, कल्याण पाटील द्वितीय आणि मयुरेश पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांचा गौरव संदीप गायकवाड, रायगड फोटोग्राफर अँड व्हिडीओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील तसेच ज्येष्ठ फोटोग्राफर सुरेश खडपे, सचिन आसराणी आणि अतुल वर्तक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय पाटील, विराज घरत, वैभव शिंदे, दीपेश पाटील, सुमित मालोदे, सुरेश पाडावे, राजेश पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमर मढवी आणि निलेश दुदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version