। अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागच्या सभासदांची त्रैमासिक सभा शनिवारी (दि. 8) दुपारी 2.30 वा. ते सायंकाळी 6.00वा. या वेळेत क्रीडा भवन नाना-नानी पार्क, अलिबाग (अलिबाग बीच) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत ‘कौटुंबिक जडणघडणीत स्त्रियांची होणारी फसवणूक’ या विषयावर अॅड. पल्लवी स.तुळपुळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे. तसेच दि.14 ऑक्टोबर 2024 ते दि.8 मार्च 2025 या कालावधीत ज्यांच्या वयाला 90वर्षे, 80वर्षे व 75वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच दि.14 ऑक्टोबर 2024ते दि. 8 मार्च 2025 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिक सभासदांचे वाढदिवस आहेत. अशा सभासदांचाही अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे.
याबाबत सभासद असलेले ज्येष्ठ नागरिक यांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेली आहेत. तरी कृपया ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागच्या सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने सेक्रेटरी नंदु तळकर यांच्याकडून करण्यात आले आहे.