मालमत्ता कर विरोधी लढ्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी, यांनी फक्त सिडको कॉलनीमधील मालमत्ताधारकांनाच, दुहेरी मालमत्ता कर लावलेला आहे. सदरचा मालमत्ता कर अवाजवी, अन्यायकारक, तसेच बेकायदेशीर आहे.त्यामुळे सिडको कॉलनी परिसरामध्ये राहणार्‍या मालमत्ता धारकांवर मोठा आघात झाला असून, त्यांचा या मालमत्ता करप्रणाली विरोधात मोठी नाराजी असून,यासाठी आता सर्वपक्षीय कृती समिती निर्माण करण्यात आली आहे.

या मालमत्ता कर प्रणाली विरोधात कॉलनी फोरम, सामाजिक संस्था, हाऊसिंग फेडरेशन, इतर संस्था तसेच शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांमधील कार्यकर्ते आपापल्या परीने आवाज उठवत, आंदोलने करत, बैठका घेत हायकोर्टात याचिका दाखल करीत आहेत.

सत्ताधार्‍यांच्या आणि प्रशासनाच्या मालमत्ता करप्रणालीला, विरोध करणार्‍या सर्वांच्या कार्यात एकसूत्रता आणि समन्वय असण्यासाठी, नगरसेविका आणि खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष लीना गरड यांनी,राजकीय पक्षाच्या व नमूद संस्थांच्या पदाधिकार्‍यांबरोबर प्राथमिक चर्चा करून,खारघर कॉलनीमधील राजकीय नेते,कार्यकर्ते,तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,अशा निवडक प्रतिनिधींची बैठक रविवार 30 ऑगस्ट रोजी उत्कर्ष हॉल सेक्टर 12 खारघर येथे आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये नगरसेविका लीना गरड, खारघर हाऊसिंग फेडरेशनचे,मंगेश रानवडे ,शेतकरी कामगार पक्षाकडून श्री मोरे,अजित अडसुळेजी यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका आणि विधान परिषद आमदार बाळाराम पाटील हे शासन पातळीवर करत असलेल्या प्रयत्न याबाबत सांगितले. शिवसेनेकडून चंद्रकांत देवरे व नंदू वारुंगसे,काँग्रेस पक्षाचे सुनील सावर्डेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्री मर्ढेकर,चंद्रकांत पाटील खारघर कॉलनी फोरम कडून रिटायर्ड कर्नल श्री. चव्हाण, सुरेश कुमार, गुलशन नरूला,अंजन पाणिग्रही, राजेश पोपळे, मारुती जाधव, पांडुरंग घुले, छाया तारळेकर आदींनी भूमिका मांडून मालमत्ता कराला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Exit mobile version